बांधकाम कामगारांना नियमानुसार प्रमाणपत्र देण्यात यावे जयंत तिजारे यांनी केली निवेदनातुन मांगनी
प्रतिनिधि : अरबाज पठान ( वर्धा )
वर्धा जिल्हाच्या खासदार अमर काळे यांना आज प्रहार जनशक्ति संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष जयंत तिजारे यांनी बांधकाम कामगारांच्या समस्या बाबत निवेदन दिले. निवेदना मधे जयंत तिजारे यांनी सांगितले की वर्धा जिल्हा मधे हजारों बांधकाम कामगार राहतात. ज्यांनी बांधकाम कामगार योजने अंतर्गत सुरु असलेल कामगार नोंदनी केली आहे. पण मागील 3 4महिन्या पासून वर्धा जिल्हातील सम्पूर्ण ग्राम सेवकांनी बांधकाम कामरांना प्रमाण पत्र देण्यास मनाई केली आहे. ज्या कारनाने बांधकाम कामगारांचे नूतनीकरन थांबलेले आहे. ग्राम सेवकांना शासन निर्नया तर्फे बांधकाम कामगारांना प्रमाण देने अनिवार्य आहे. पण यांच्या प्रमाणपत्र नाही देण्याच्या निणर्या मुळे हजारों कामगार शासना तर्फे मिळत असलेले लाभा पासून वंचित राहत आहे.खासदार अमर काळे यांनी आश्वासन दिले की ते लवकरच ग्राम सेवक व CO साहेबांची मीटिंग बोलावून बांधकाम कामगारांची समस्याँच प्रश्न मार्गी लावू.